Birth Anniversary of Pu La - Marathi legend

Today is Pu La's birth anniversary. I accidently happened to notice it while surfing the site
पु. ल. देशपांडे a site dedicated to Pu La Deshpande.

I reproduce below one his speech 'sujan ho' taken from मराठी साहित्य that reflects his philosophy towards life in succinct manner.

'सुजनहो' या त्यांच्या भाषणांच्या संग्रहातून घेतलेला हा एक उतारा --भारतीय संस्कृती म्हणा किंवा माणसाची संस्कृती म्हणा, दोन गोष्टींवर अधिष्ठित आहे, असं मला वाटतं. एक म्हणजे आठवड्याचा बाजार आणि एक वर्षाचा उत्सव. आठवड्याचा बाजार हा तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो; आणि वर्षाचा उत्सव तुमच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो. एक फार सुंदर चिनी म्हण आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की, 'तुम्हांला दोन पैसे मिळाले, तर एका पैशाचे धान्य आणा, आणि एक पैशाचं फूल आणा. एक पैशाचं धान्य तुम्हांला जगवेल आणि फूल तुम्हांला कशासाठी जगायचं हे कारण सांगेल.' संगीत तुम्हांला, का जगायचं याचं कारण सांगतं. तुम्हांला जगायचं आहे कशासाठी? मला मोगूबाई ऐकायच्या आहेत, मला भीमसेन ऐकायचे आहेत, मला किशोरीबाई ऐकायच्या आहेत, मला दीनानाथांचं गाणं ऐकायचं आहे. याच्यासाठी जगायचंय. सगळ्या कलांचा आनंद घ्यायचाय. मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, तो शब्दसुद्धा तसाच हवा. आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला 'उपजीविका' म्हणतात. ती 'जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे आणि ती जीविका कलावंत माणसं देत असतात, म्हणून त्यांचे हे उपकार.
You may call it an Indian Culture or Humanity. I feel, it is based on two premises. First – weekely mundane grocery purchase and second annual festivities. Weekly groceries fulfills body needs and Yeraly festivities satiate mind needs.There is a nice proverb in chinese : It says, if you have two penny , buy foodgrain from one and flower from another. Foodgrain purchased from the first penny will make you survive and flower will teach you the reason for your existance. For me, Music guides me the reason to live. I want to listen to great singers Mogubai Kurdikar, Kishori Amonkar, Dinanath Mangeshkar. For their music, I want to live. I want to enjoy the beauty of the creative arts. Whatever we do to fulfill the hunger pangs is existance and not living –for me, living means appreciation of paintings, acting, dancing and joyful happiness. Living a life means embodiment of happiness within oneself and this is real life living and all creative artists have enabled me to enjoy this life. I shall always remain indebted to them

Comments

Popular posts from this blog

10cc gulp and 24 hour high

Rabbit and Tortoise story in Marathi musical

Madhav Julian and Indiver -प्रेमस्वरुप आई and Zindgi Ka Safar