Posts

Showing posts from January, 2011

Pune by Varsha Raje

पुणं म्हणजे पुणं म्हणजे पुणं होतं तुम्हीच सांगा पुण्यामध्ये काहीतरी का उणं होतं? पूर्वीचं पुणं म्हणजे विद्येचं माहेरघर पुणं म्हटल्यावर डोळ्यांसमोर गोखले, टिळक, आगरकर! पेशवे, कर्वे, फडके आणि मराठी संस्कृती लाल महाल, शनिवार वाडा व कुठूनही दिसणारी पर्वती पेशवाई पुणं, एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिध्द अहो, दारू, मांस, मच्छी दूरच, इथं अंड सुद्धा निषिद्ध पुणं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला-संगीताचा उगम तरुणाई साठी वरदान बंड गार्डन आणि मुळा मुठेचा संगम पुणं म्हणजे गारांचा पाऊस, राजेशाही वाडे आणि घोडागाडी छोटे छोटे टुमदार बंगले आणि सभोवताली शोभिवंत झाडी नाकात नथ, केसांचा खोपा, लफ्फेदार शालू आणि पुरुषांची पगडी साता समुद्रापार पोचलेली इथल्या चितळ्यांची बाकरवडी ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम असे कितीक संत जाहले गंमतशीर मारुतींनी पुणे शहर भरले मुबलक भाज्या, स्वस्त फळे, फळांचा आगळा स्वाद सारस बागेतल्या गणपतीच्या देवळात, घंटेचा घुमतो नाद पुणं म्हणजे नव्हेत केवळ 'पुणेरी पाट्या' अमेरिकेतल्या शिक्षणात आहे इथल्या मुलांचा मोठा वाटा कर्मठ भासले तरी या मातीत चांगले modern विचारही रुजतात रां परांजपे