Sunday, January 24, 2010

प्रभाती सूर नभी रंगती

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

पानोपानी अमृत शिंपीत, उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊन फुले सुगंधित, तालावर डोलती

कृषीवलाची हाक ऐकूनी, मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळिवती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी, सडे शिंपीती मृदुल करांनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी, तार कुणी छेडीती

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home