श्री. विंदा करंदीकर-२००३ ज्ञानपीठ पुरस्कार

When i was studying at SIES college in 1975-77, college was known for Prof Ramjoshi who went on to become Chancellar at Bombay University, Prof Menon who was known for his whimsical ways of Physics teaching . But i had also learnt that noted Marthi writer Mr. Vinda Karandikar also taught Marathi for Arts Faculty.

Mr. Vinda Kanrandikar stayed at Sahitya Sahwas and I thought I would have an opportunity to see him during my travel from Sion to Kalanagar in route 371 bus. Often I would have a professor from arts faculty with me but then he didnt look like Mr Vinda Karandikar. I had seen Vinda's photograph in marathi books but this prof didnt resemble like him. He turned out to be Prof Bandiwadekar. My seeing vinda remained unfullfilled dream. As I read about him getting Jyanpeeth award, memories went to those initial years at SIES.

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री. विंदा करंदीकर यांना भारतीय साहित्यसृष्टीतील सर्वोच्च मानाचा २००३ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आत्ताच येथे ऐकली. (मुंबई आकाशवाणीचे महाजालावरील संकेतस्थळ)मराठीला फार वर्षांनी हा बहुमान लाभला आहे. १९६५ सालापासून ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आतापर्यंत जाहीर ३८ पुरस्कारांपैकी केवळ दोन पुरस्कार मराठीच्या वाट्याला आले आहेत. (वि. स. खांडेकरांना १९७४ मध्ये, तर कुसुमाग्रजांना १९८७ मध्ये) परंतु याच कालावधीत सात कन्नड, सहा हिंदी व पाच बंगाली भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे.(दुर्गाबाई भागवतांनी हा पुरस्कार सविनय नाकारला, आणि कन्नड भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी ज्ञानपीठ मिळवणारे कवी द.रा.बेंद्रे हे मराठी भाषक होते, ही काहीशी अज्ञात असणारी माहिती यासंदर्भात सांगावीशी वाटते.)विंदांना हा पुरस्कार काहीसा विलंबाने मिळाला असला, तरी त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. वसंत बापट - मंगेश पाडगावकर - विंदा करंदीकर या कवित्रयीने जाहीर काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रातील गावागावांत करून मर्ढेकरोत्तर मराठी काव्याला नवसंजीवनी दिली. खुद्द विंदांचे 'ऐसा गा मी ब्रह्म' आणि 'स्वेदगंगा' हे काव्यसंग्रह अतिशय उच्च प्रतीचे गणले जातात. समाजातील शोषितांचे अंतरंग त्यांनी या कवितासंग्रहांतून प्रभावीपणे मांडले आहे, आणि विशेष म्हणजे हे सारे करताना कुठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नाही.ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून मराठी साहित्याचे क्षितिज रूंदावणाऱ्या खांडेकर-शिरवाडकर-करंदीकर प्रभृतींचे कार्य पाहून तेथे "कर" माझे जुळती म्हणावेसे वाटते.
http://marathisahitya.blogspot.com/2006/01/blog-post_08.html

Comments

Popular posts from this blog

10cc gulp and 24 hour high

Rabbit and Tortoise story in Marathi musical

Madhav Julian and Indiver -प्रेमस्वरुप आई and Zindgi Ka Safar